महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता.. रात्री १२ पर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - imp news

जमीन गैरव्यवहार प्रकरणी चंद्रकात पाटलांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी. जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील संतापले. "कशाची कर्जमाफी.. अन कशाच काय ? बँकवाले जवळ येऊ देईनात"ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: नांदेड बहिष्कार प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल; चौकशीचे आश्वासन. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे पुण्यनगरीत आमगन, वारकरी भक्तीरसात तल्लीन.

महत्वाच्या बातम्या

By

Published : Jun 27, 2019, 12:00 AM IST

जमीन गैरव्यवहार प्रकरणी चंद्रकात पाटलांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी


मुंबई- राज्य सरकार नियमांची पायमल्ली करून बिल्डरांचा फायदा करत आहे. महसूलमंत्र्यांच्या सहमतीने हवेली तालुक्यातील म्हातोबा ट्रस्टची ८४ कोटी रुपयांची इनाम जमीन विकली गेली. यात ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी. खडसेंवर जशी कारवाई केली, तशी कारवाई महसूलमंत्र्यांवरही करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. वाचा सविस्तर...

जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील संतापले

मुंबई- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी विधानसभेत जमीन गैरव्यवहाराच्या आरोपाने चांगलेच घायाळ झाले. विरोधकांनी घोटाळ्यांची चौकशी करण्याची मुख्यमत्र्यांकडे मागणी केली. तसेच महसूलमंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधक अडून बसले. त्यामुळे चद्रकांत पाटील चांगलेच संतापले होते. वाचा सविस्तर...

"कशाची कर्जमाफी.. अन कशाच काय ? बँकवाले जवळ येऊ देईनात"

हिंगोली- कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष उलटले. मात्र, अद्याप हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कमच जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या तोंडावर बँकेच्या पायऱ्या झिजवत आहेत. वाचा सविस्तर...

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: नांदेड बहिष्कार प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल; चौकशीचे आश्वासन


नांदेड
- पिंपरी महिपाल येथील पारधी कुटुंबावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याने या कुटुंबातील महिलेचा गर्भपात झाल्याचा प्रकार 20 जूनला घडला होता. गावकर्‍यांच्या सांगण्यावरून प्रवाशी वाहनधारकांनी संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यास नकार दिला होता. याप्रकरणाचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आज जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या सुचनेवरुन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरतकुमार मुदीराज यांच्यासह लिंबगाव पोलीस स्थानकाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी पिंपरी महिपाल येथे जावून पारधी कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.वाचा सविस्तर...

ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे पुण्यनगरीत आमगन, वारकरी भक्तीरसात तल्लीन

पुणे- विठ्ठल्याच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज पुण्यात आगमन झाले. यावेळी लाखो वारकऱ्यांचा जनसागर पालखीबरोबर होता. पुणेकरांनी माऊलींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. हा देखणा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केली होती.वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details