मंत्रिमंडळाचा विस्तार : विखे, क्षीरसागरांसह शेलारांनी घेतली शपथ
मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रलंबीत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नवीन मंत्र्यांचा शपथविधीला सुरूवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर १३ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्या सर्वानी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. हेही वाचा...
राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्रिपदे
बीड - दिवंगत केशर काकू क्षीरसागर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बीड जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व राज्यस्तरावर केले. मात्र, एकाच वेळी बीड जिल्ह्याला २ कॅबिनेट मंत्री पदे बीडच्या राजकीय इतिहासात कधीच मिळालेले नाहीत. यावेळी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीडच्या वाट्याला २ कॅबिनेट मंत्रीपदे आली असल्याने विकासाचा आलेख दुपटीने उंचावेल, अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आहे. हेही वाचा...
शिवसेनेचे पुन्हा एकदा 'मिशन राम मंदिर'; 'मंदिर तो हो के रहेगा'चा उद्धव यांचा अयोध्येत नारा