महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...( शुक्रवार २१ जून २०१९) संध्याकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - संभाजीराजे

आरक्षण गेलं खड्ड्यात..! पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा, संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप. कुरखेडाचे माजी उपविभागीय अधिकारी काळे निलंबित: भुसुरुंग स्फोट प्रकरणात प्रोटोकॉल न पाळल्याचा ठपका. नाशिकमध्ये पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोन्ही भावंडांचा मृत्यू. योगादिन विशेष; योगामुळे नव्वदीतही आहेत चिरतरुण 'नामदेवराव बानोरे'. Khandani Shafakhana trailer: संपत्तीसाठी सेक्स क्लिनीक चालवणाऱ्या सोनाक्षीची कथा.

संध्याकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

By

Published : Jun 21, 2019, 7:00 PM IST

आरक्षण गेलं खड्ड्यात..! पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा, संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप

कोल्हापूर - आरक्षणाच्या मुद्दयावरुन खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आरक्षण गेलं खड्ड्यात' पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, असे ट्वीट करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

कुरखेडाचे माजी उपविभागीय अधिकारी काळे निलंबित: भुसुरुंग स्फोट प्रकरणात प्रोटोकॉल न पाळल्याचा ठपका

गडचिरोली- १ मे महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा लगतच्या जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान हुतात्मा झाले. या घटनेला जबाबदार धरून कुरखेडाचे माजी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित झाला असता, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना निलंबित केल्याची घोषणा केली. काळे सध्या जळगाव जिल्ह्यात कार्यरत होते.वाचा सविस्तर...

नाशिकमध्ये पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोन्ही भावंडांचा मृत्यू

नाशिक- शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय भोये यांनी घरगुती भांडणातून सावत्र मुलांवर गोळीबार केला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण रुग्णालयात उपचार घेत असताना मरण पावला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपी पोलीस नाईक संजय भोये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर...

योगादिन विशेष; योगामुळे नव्वदीतही आहेत चिरतरुण 'नामदेवराव बानोरे'

यवतमाळ - आपल्या जीवनात योगाचे किती महत्त्व आहे, याचे महत्व पटवून देणारे शहरातील ९० वर्षाचे आजोबा एक मुर्तीमंत उदाहरण आहेत. नामदेवराव बानोरे असे या आजोबांचे नाव आहे. त्यांचा या वयातील व्यायाम आणि योगासणे करण्याचा उत्साह पाहिला तर ते तरुणाई देखील अचंबित होईल, असा व्यायाम ते अगदी सहजगत्या करतात. योगा हे त्यांच्या फिटनेसचे गुपित आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते नियमित स्वरूपात योगा करतात. रोज सकाळी ते पद्मासन घालून सुमारे अर्धा तास बसतात. पद्मासन हा एक योगाचा प्रकार आहे. वाचा सविस्तर...

Khandani Shafakhana trailer: संपत्तीसाठी सेक्स क्लिनीक चालवणाऱ्या सोनाक्षीची कथा

मुंबई - सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि बादशाह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'खानदानी शफाखाना' चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणाऱ्या या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details