महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tata Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपीयाच्या धावपटूंचे वर्चस्व; जाणून घ्या भारतीयांमध्ये विजयी कोण? - हेलू झेदू

मुंबई मॅरेथॉन नुकतीच पार पडली. मॅरेथॉनमध्ये इथिओपीयाच्या धावपटूंचे वर्चस्व पहायला मिळाले. गोपी टी या भारतीय धावपटूंनीही मॅरेथॉनमध्ये विजय मिळवला. जाणून घेऊयात विजयी धावपटूंची नावे.

18th Tata Mumbai Marathon
१८ वी टाटा मुंबई मॅरेथॉन

By

Published : Jan 15, 2023, 10:46 AM IST

इथिओपीयाच्या धावपटूंचे वर्चस्व

मुंबई : १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:१५ वाजता सुरुवात झाली होती. एलिट धावपटूंसाठी असणारी ४२.१९७ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन नुकतीच पार पडली. या मॅरेथॉनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी झेंडा दाखवला होता. संपूर्ण मॅरेथॉन कॅटेगिरीमध्ये ५५ हजार धावपटू धावले यात विदेशी धावपटूंसह भारतीय धावपटूंनीही बाजी मारली. हयले लेमी, फिलेमन रोनो, हेलू झेदू अशी विजयी धावपटूंची नावे आहे.

इथिओपीयाच्या धावपटूंचे वर्चस्व :मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपीयाच्या धावपटूंचे वर्चस्व पहायला मिळाले. हायले लेमी याने पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी मारली. तर भारतीय धावपटूंमध्ये गोपी टी हे विजयी झाले. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या हयले लेमी यांनी २ तास ७ मिनिटे ३२ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. तर दुसऱ्या क्रमांकावर केनियाचे फिलेमन रोनो यांनी २ तास ८ मिनिटे ४४ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. तर तिसऱ्या क्रमांकावर असणारे हेलू झेदू इथोपियन नागरिका असणारे यांनी २ तास १० मिनिटे २३ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भांगडा डान्स :टाटा मुंबई मॅरेथॉन आज मुंबईत पार पडली. या स्पर्धेत हजारो मुंबईकर सहभागी झाले होते. थंडीचा जोर आणि मुंबईकरांचा उत्साह या स्पर्धेत पाहायला मिळाला. दहा आणि 21 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अनेक स्पर्धकांनी जल्लोष केला. यावेळी येथे वाजत असलेल्या ड्रमवर भांगडा डान्स करत स्पर्धेचा आनंद लुटला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आणि उत्साह दिसून येत होता.

दोन वर्षानंतर मुंबईकर धावले : घड्याळाच्या काट्यावर चालणारे शहर म्हणजे मुंबई अशी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ओळख आहे. इथे प्रत्येक जण आपल्या वेळेनुसारच धावत असतो. त्याला मुंबईच स्पिरिट असे म्हणतात. मात्र, आता तब्बल दोन वर्षानंतर मुंबईच हे स्पिरिट 18 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले होते. 2020 नंतर प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईकर आपले कौशल्य दाखवण्यासाठी धावत होते. 2021 आणि 2022 मध्ये मुंबई मॅरेथॉनचे आयोजन कोरोनामुळे होऊ शकले नाही. यामुळेच यावेळच्या मॅरेथॉनबद्दल लोकांमध्ये अधिक उत्साह होता. यावेळी मुंबई मॅरेथॉनसाठी 55 हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. हाफ मॅरेथॉन वगळता इतर सर्व शर्यती रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू झाल्या.

योहान ब्लेक ब्रँड अँबेसेडर : या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर असलेला योहान ब्लेक याच्यामते मॅरेथॉन धावणे सोपे नव्हते. यात याप्रकारे एका विशिष्ट वेगाने धावावे लागते आणि हे इतके सोपे नाही. त्यासाठी सर्वोत्तम शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती असणे गरजेचे आहे. मॅरेथॉन धावपटूंना त्यांच्या पात्रतेइतका आदर मिळतो. असे १०० मीटर धावणे प्रकारातील जगजेताआणि टाटा मुंबई मॅरेथॉन चा आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसिडर योहान ब्लेक यांनी म्हटले होते.

इतरही विविध सुविधा : ५०० सदस्यांच्या महत्त्वाच्या टीम शर्यतीच्या दिवशी तैनात होत्या. तसेच ८०० ट्राफिक पोलीस ६०० पोलीस ऑफिसर आणि ३ हजार पोलीस या दिवशी रूटवर तैनात होते. तसेच ४५० मेडिकल स्टाफ आणि एशियन हार्टचे ५० वॉलेंटियर त्यांच्यासोबत १३ ॲम्बुलन्स, डॉक्टर मोटरसायकलवर तैनात होते. रस्त्यांचे मार्ग सुद्धा बदलण्यात आले असून तीन ठिकाणी ५०,५० आणि ३० खाटांचे बेस कॅम्प तयार करण्यात आले होते. १६ एड स्टेशन सुद्धा तयार करण्यात आले होते. २५ वॉटर स्टेशन, १० स्नॅक स्टेशन, ११ एलिट ड्रिंक स्टेशन तैनात करण्यात आले होते. सायन्स स्टेशन ते माहीम या दरम्यान सकाळी ३ ते ५ वाजता ३० बस सेवा सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :Ajit Pawar : बोलू नका कारवाई करा.. धमकाविण्यांवर कारवाई करण्याच्या फडणवीस यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details