लॉकडाऊनच्या काळात मुंबईत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर
मुंबईत लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर असल्याचे ईटीव्ही भारतने केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये समोर आले आहे. काही वस्तूंच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर
By
Published : May 23, 2020, 1:19 PM IST
|
Updated : May 28, 2020, 5:56 PM IST
मुंबई- देशभरात लॉकडाऊन होऊन दोन महिने होत आहेत. लॉकडाऊनचे चौथे पर्व देशात सुरू आहे. लॉकडाऊन होऊन दोन महिने झाले असूनही मुंबईत परिस्थिती नाजूक आहे. मुंबई शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून रुग्णसंख्या 20 हजार पार गेली आहे.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यवहार ठप्प आहे. जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्व वस्तूंचे व्यवहार मुंबईत बंद आहेत. कोरोनाच्या या लढाईत सामान्य माणूस घरी बसून निकराने ही लढाई लढत आहे, अशा स्थितीत जीवनावश्यक वस्तूंची मुंबईत काय परिस्थिती आहे. याचा रिअॅलिटी चेक ईटीव्ही भारतच्या टीमने केला.
मुंबईत लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर
लॉकडाऊनमुळे एकीकडे बाजारपेठ बंद असली तरी जीवनावश्यक वस्तूंचे दर, पुरवठा कसा आहे याचा आढावा घेण्यासाठी व्यापरांशी संपर्क करण्यात आला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ डाळी, गहू, तांदूळ सारखी धान्ये यांचे भाव स्थिर आहेत. काही धान्याचे भाव 5 ते 8 % किंचित वाढले असून बाकी वस्तुंचे दर स्थिर आहेत.
मुंबईत धान्याच्या किंमती
धान्य
लॉकडाऊनपूर्वीची किंमत/kg
लॉकडाऊनमधील किंमत
मुगडाळ
130-140
150-160
तूरडाळ
100-110
110-120
तांदूळ
40-45
50-55
गहू
30-35
35-40
लॉकडाऊनच्या सुरुवातीचे काही दिवस वगळता पुरवठा साखळी ही सुरळीत आहे. सरकारने धान्य पुरवठ्या संदर्भात विविध उपाययोजना केल्या आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रायगडमध्ये लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूची दरवाढ, गृहिणीचे कोसळले बजेट
कोरोना संकटामुळे अत्यावश्यक सेवाची वाहतूक सुरू असली तरी बाजारात येणारा भाजीपाला, कडधान्य, तेल याची आवक काही प्रमाणात ही घटलेली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू बाजारात मिळत असल्या तरी वाहतुकीवरील वाढलेला खर्च आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे भाव ही वाढले आहेत. जिल्ह्यात वांगी, भेंडी, पालेभाजी, टॉमेटो, मिरच्या ह्या भाज्या पिकत असल्याने याचे भाव स्थिर आहेत. मात्र, बाहेरून येणारी मटार, फरसबी, कोबी, फ्लॉवर ह्या भाज्यांचे भाव हे किलोमागे 140 रुपये झाले आहेत. त्यामुळे भाज्या खरेदी करताना गृहिणींना काटकसर करावी लागत आहे.
जीपाल्याचे दर वाढले असताना डाळींच्या दरात ही चढउतार सुरू आहे. खाद्य तेलाचीही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे जेवणाची फोडणीला लागणारे तेलही आता भाऊ खाऊन गेलं आहे. एकीकडे कोरोनामुळे कामे बंद आहेत. काहींची कामे ही घरातून सुरू आहेत. मात्र तरीही पगारात कपात होत आहे. तर हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला असून वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीमुळे सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे.