मुंबई - गोरेगाव येथील आरे कॉलनीत मेट्रो ३ या प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. हे कारशेड तयार करण्यासाठी तब्बल २ हजार ७०० झाडे तोडण्यात येणार आहेत. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीला अनेकांनी विरोध केला आहे. आज या विरोधात पर्यावरण प्रेमी आणि सामान्य मुंबईकरांनी चर्चगेट ते मरीन लाईन्स असा लॉग मार्च काढला. यावेळी सेव्ह आरेच्या घोषणा देण्यात आल्या व कारशेड दुसऱ्या जागी हलवा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जर प्रशासन नमले नाहीतर चिपको आंदोलनच्या धर्तीवर आंदोलन उभारू असा इशारा ही आयोजकामार्फत यावेळी देण्यात आला.
...अन्यथा चिपको आंदोलन करू; पर्यावरणप्रेमींचा सरकारला इशारा - Environmentalists
गोरेगाव येथील आरे कॉलनीत मेट्रो ३ या प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. हे कारशेड तयार करण्यासाठी तब्बल २ हजार ७०० झाडे तोडण्यात येणार आहेत. परंतु, एवढ्या मोठया प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीला अनेकांनी विरोध केला आहे. जर ही वृक्षतोड थांबवली नाही तर चिपको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आरे कॉलनीमध्ये तयार होणाऱ्या कारशेडला मुंबईकर, कलाकार आणि मनसे, शिवसेना या राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता. मात्र, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे आज पर्यावरण प्रेमी, जेष्ठ नागरिक, युवक यांच्यामार्फत चर्चगेट ते मरीन लाईन्स असा लॉग मार्च काढण्यात आला. यामध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
आमचा या कारशेडला विरोध आहे. हे कारशेड दुसऱ्या जागी व्हावे, अशी आम्ही मागणी करत आहे. मात्र, कांजुरमार्गला पर्याय उपलब्ध असताना प्रशासन आरेच्या जागेचा अट्टाहास धरत आहे. यासाठी २ हजार ७०० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. जी झाडे आपल्याला पुरापासून वाचवतात त्यांचा कत्तल करणार का? चांद्रयान - २ साठी ९०० कोटीच्या आसपास खर्च येतो आणि दुसरीकडे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी म्हणतात हे आरेयेथील कारशेड हलवण्यासाठी ५ हजार कोटी खर्च येईल. जर यांनी निर्णय बदलला नाही तर आम्ही चिपको आंदोलनासारखे आंदोलन उभारू असे आयोजक सागर सिंग यांनी सांगितले.