मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०२७ पर्यंत 'बेस्ट'मध्ये १०० टक्के इलेक्ट्रीक बस आणल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. पर्यावरण रक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
वातावरण कृती आराखडा
वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन, ई-बस मिशन अशा तीन सामंजस्य करारावर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. वातावरण बदलाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. वातावरण बदलामुळे काही देशांच्या पर्यावरणासह अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई वातावरण कृती आराखडा बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस कॅम्पेन आणि ई-बस मिशन उपक्रमाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
इलेक्ट्रिक बसेस
मुंबईकरांच्या वाहतूक सुविधेसाठी बसेसची संख्या दहा हजारांवर नेली जाणार आहे. या सर्व गाड्या इलेक्ट्रीक प्रकारच्या असतील असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. २०२७ पर्यंत 'बेस्ट'मध्ये १०० टक्के इलेक्ट्रीक बस आणल्या जाणार आहेत. शिवाय लवकरच २०० डबल डेकर आणि १९०० बस इलेक्ट्रीक प्रकारच्या आणल्या जाणार आहेत. 'बेस्ट'च्या ताफ्यात सध्या ३२४२ बसेस आहेत. तर एक हजार बस भाडे तत्त्वावर धावत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
वुमन फॉर क्लायमेट