मुंबई - माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचलनालयामार्फत तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर सुटका करण्यात आली. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगच्या इकबाल मिर्ची सोबत गैरव्यवहार आरोपप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली.
हेही वाचा -मी जोपर्यंत आहे तोपर्यंत संविधानाला हात लाऊ देणार नाही - रामदास आठवले
शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता पटेल ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 12 तास त्यांची मुंबईतील सिजे इमारतीच्या या बांधकामाबद्दल चौकशी केली आहे. त्यानंतर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पटेल यांना ईडी कार्यालयातून घरी सोडण्यात आले.
हेही वाचा -खारघरमधल्या प्रसिद्ध कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाकडून तरुणीवर बलात्कार
दरम्यान, ईडी कार्यालयात झालेल्या चौकशीबद्दल पटेल यांनी बोलणे टाळले आहे.