मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पात पुलाच्या बाहेरील बाजूस वाहतूक सुरक्षिततेसाठी ( England After a Successful Trial in South Korea ) संरक्षण कठडा उभारण्यास सुरुवात केली आहे. या कठड्याची एकूण उंची १५५० मिमी म्हणजे सुमारे ५ फूट आहे. या संरक्षण कठड्याच्या खालच्या भागात ९०० मिमी कॉंक्रिटचे बांधकाम असून, त्यावर दक्षिण कोरियातून मागविलेल्या ६५० मिमी उंचीच्या भागात स्टील रेलिंगचे बांधकाम वेगाने सुरू आहे. इंग्लंड, दक्षिण कोरियात यशस्वी चाचणीनंतर मुंबई पारबंदर प्रकल्पावर संरक्षक कठडा उभारण्याचे काम सुरू झाले.
प्रवाशांना समुद्रात पाहताना दिसणार निसर्ग सौंदर्यप्रकल्पामध्ये ५ फूट उंचीची संरक्षणभिंत उभारणे प्रस्तावित होती. पण, त्यामुळे प्रवाशांना समुद्रात पाहताना निसर्ग सौंदर्य दिसण्यात अडथळा निर्माण झाला असता. या सुधारित डिझाईनमुळे समुद्रातील विहंगम दृश्यांचा तसेच फ्लेमिंगो पाहण्याचा आनंद प्रवाशांना घेता येईल. संरक्षण कठडा उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले गेले. कोणत्याही प्रकल्पामध्ये या रीतीने बांधकाम करीत असताना आंतरराष्ट्रीय नियम आणि त्याचे निकष याचे पालन करणे प्रत्येकाला सक्तीचे असते. त्यामुळे EN १३१७ या आंतरराष्ट्रीय मानकाचे पालन करीत मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी गॅल्वनाइज्ड स्टीलच्या रेलिंगचा वापर करण्यात आला असून, याची प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली आहे.