महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी महापालिकेच्या आणखी एका अभियंत्यास अटक

आझाद मैदान पोलिसांनी यापूर्वी ३ आरोपींना अटक केली होती. यामध्ये ऑडीटर नितीन कुमार देसाईसह सहाय्यक अभियंता एस. एफ कुलकुलते आणि अनिल पाटील यांचा समावेश आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.

सीएसएमटी पूल दुर्घटना

By

Published : May 7, 2019, 12:27 PM IST

Updated : May 7, 2019, 1:07 PM IST

मुंबई- सीएसएमटी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेच्या पुन्हा एका माजी मुख्य अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. शितलाप्रसाद कोरी (वय ५८) असे या अभियंत्याचे नाव आहे.

सीएसएमटी पूल

आझाद मैदान पोलिसांनी यापूर्वी ३ आरोपींना अटक केली होती. यामध्ये ऑडीटर नितीन कुमार देसाईसह सहाय्यक अभियंता एस. एफ कुलकुलते आणि अनिल पाटील यांचा समावेश आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.

कळकुलते आणि अनिल पाटील यांना पुलाचे मिळालेल्या ऑडिट रिपोर्टचे निरीक्षण करण्याची जबाबदारी होती. माजी मुख्य अभियंता शितलाप्रसाद कोरी यांच्यावर निष्काळजीपणा बाळगल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काय होते नेमके प्रकरण?
गेल्या १४ मार्चला सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास सीएसटीएमटी रेल्वे स्थानकात लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या पुलाचा मोठा भाग अचानक कोसळला होता. या पादचारी पुलावरून जाणारे लोक स्लॅबसह खाली कोसळले होते. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ३ महिलांचाही समावेश होता. शिवाय ३४ जण जखमी झाले होते.

Last Updated : May 7, 2019, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details