माणिक बेहरामकदीन, बिझनेस हेड, गोदरेज एरोस्पेस मुंबई : चांद्रयान-3 मोहीमेला येत्या 14 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. चांद्रयान आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेणार असले तरी या यानाचे इंजिन मुंबईच्या गोदरेज कंपनीत तयार झाले आहे. सुमारे 80 टनाचे हे इंजिन इस्रोच्या डिझाईन नुसार तयार करण्यात आल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी माणिक बेहराम यांनी दिली आहे.
इंजिनचे 80 टक्के काम गोदरेज कंपनीत झाले : चांद्रयान 3 साठी लागणाऱ्या इंजिनचे 80 टक्के काम मुंबईतील गोदरेज कंपनीत पूर्ण झाले आहे. चांद्रयानामधील एल 110 विकास इंजिन आणि क्रायोजनिक इंजिन हे गोदरेज कंपनीत तयार करण्यात आले आहेत. या इंजिनमध्ये नेमके कोणते भाग वापरण्यात आले आहेत, हे आज गोदरेज कंपनीच्या वतीने प्रसार माध्यमांना दाखवण्यात आले. चांद्रयानात 160 टनाचे लिक्विड इंजिन आणि विष्ठाणाचे क्रायोजनिक इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनची हाय अल्टीट्यूड टेस्ट घेतल्यानंतरच त्याला कायम करण्यात आले आहे. इस्रोच्या या मोहिमेसाठी गोदरेज कंपनीला योगदान देता आले, याचा गोदरेजला अभिमान वाटत असल्याचे माणिक यांनी सांगितले.
इस्रोच्या तीनही मोहिमांसाठी इंजिन बनवले : इस्रोच्या चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 या तीनही मोहिमांसाठी एअरक्राफ्ट तयार करताना लागणारे इंजिन आणि काही भाग हे गोदरेज कंपनीमध्ये तयार करण्यात आले आहेत. इस्रोने सांगितलेल्या डिझाईन नुसार हे भाग तयार करण्यात येतात. कंपनी केवळ इंजिन तयार करून इस्रोकडे सुपूर्द करते. त्यानंतर इस्रो सॅटेलाइट आणि चंद्रयान निर्मिती करते. अवकाश यान निर्मितीमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आणि निर्मिती करण्यासाठी गोदरेज कंपनीच्या वतीने 3 हजार कोटी रुपये गुंतवण्यात येणार आहेत. त्यासाठी पनवेल जवळील खालापूर येथे प्लांट उभारणी सुरू असल्याचे गोदरेजच्या वतीने सांगण्यात आले.
कावेरी इंजिन तयार करण्यातही सहभाग : डीआरडीओ कावेरी प्रोजेक्ट डीआरडीओचा कावेरी इंजिन जीटीआर प्रोजेक्ट म्हणजेच गॅस टरबाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये कावेरी इंजिन तयार करण्यातही गोदरेज कंपनीचा सहभाग आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प गोदरेजच्या सहकार्याने तयार होत आहे, ही बाबही महत्त्वाची असल्याचे माणिक यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Chandrayaan 3 Mission : चांद्रयान 3 मोहीमेची तयारी पूर्ण, स्पेसक्राफ्ट रॉकेटला जोडण्यात यश