मुंबई - येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अखेर अटक केली आहे. तब्बल 30 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
खासगी क्षेत्रातील येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीने अटक केली आहे. येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या मुंबईतील 'समुद्र महल' या निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. यामध्ये त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा -येस बँक प्रकरण: चौकशीसाठी राणा कपूरला आणले 'ईडी' कार्यालयात...
दरम्यान, येस बँकेकडून डीएचएफएल कंपनीला काही हजार कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राणा कपूर यांच्या काही नातेवाईकांच्या बँक खात्यात रक्कम वळविण्यात आली होती. यात राणा कपूर यांची पत्नी बिंदू यांच्या बँक खात्याचाही समावेश होता. त्यांच्यावर मनी लॉड्रिंगची शंका असल्याने शुक्रवारी रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापेमारी केली. यानंतर कपूर यांची कसून चौकशी करण्यात आली होती, अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीची छापेमारी