मुंबई :प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरी भोवती असलेली अनधिकृत बांधकामे हटवल्यानंतर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबईतील गडकिल्ल्यांवरही अनधिकृत बांधकामे (Unauthorized constructions on forts in Mumbai) मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवर कमी-अधिक प्रमाणात अनधिकृत बांधकामे (Encroachments on all forts)असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Tourism Minister Mangal Prabhat Lodha) यांनी दिली आहे. या गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची (removal of encroachments on forts) गरज आहे. त्यासाठी पुरातत्व अभिलेख विभागाबरोबर संपर्क साधून संयुक्तरित्या मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. latest news from Mumbai
नाशिकमधील घटनेची सखोल चौकशी :नाशिक मधील बाल सुधार गृहात मुलींच्या झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाचे उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे येत्या सात दिवसांमध्ये या संदर्भातला अहवाल मागवण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले दरम्यान महिला बाल सुधार गृहांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नाही तसेच सक्षम डॉक्टरही नाहीत या बाबीकडे आपले लक्ष असून त्याची पूर्तता करण्यासाठी ही सरकार प्रयत्न करीत आहे. काही कौशल्य विकास कार्यक्रमही बाल सुधार ग्रहांमध्ये सुरू करण्याचा विचार असून येत्या सहा महिन्यांमध्ये चित्र पालटलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर महिला सुधार गृहांमध्येही फारशी बरी परिस्थिती नसून सुधारणा करण्याला वाव आहे त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.