महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हैदराबाद पोलिसांचे स्वागत, न्यायव्यवस्था जलद गतीने चालावी - प्रदीप शर्मा

हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चारही मुख्य आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याबद्दल प्रदीप शर्मा यांनी हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन केले. तसेच अशा प्रकारात न्यायव्यवस्था आणखी कडक व जलदगतीने चालली, तरच अशा प्रकारच्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

mumbai
माजी पोलीस अधिकारी व एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा

By

Published : Dec 6, 2019, 7:22 PM IST

मुंबई - हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा आज पोलिसांनी एन्काऊंटर केला. याचे माजी पोलीस अधिकारी व एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी स्वागत करत हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन केले. अशा प्रकारात न्यायव्यवस्था आणखी कडक व जलद गतीने चालली, तरच अशा प्रकारच्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळेल, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले.

ईटीव्ही भारतशी बोलताना माजी पोलीस अधिकारी व एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा

हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चारही मुख्य आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याबद्दल प्रदीप शर्मा यांनी हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन केले. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शर्मा म्हणाले, पोलिसांनी एन्काऊंटर केला, कारण आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी आरोपींवर गोळ्या झाडल्या. हंड्रेड सीपीआरप्रमाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असे शर्मा म्हणाले.

हेही वाचा - #Encounter न्याय झालाय परंतु, ही पद्धत अन्यायकारक - नवाब मलिक

ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्यायाची लवकर अपेक्षा असते. परंतु, भारतात जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती संथ आहे, त्यामुळे न्याय मिळता-मिळता लोकांवर अन्याय होतो. म्हणूनच सर्वजण अशा प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळण्याची मागणी करत असतात. मात्र, तसे होत नाही त्यामुळे आज झालेल्या एन्काऊंटरबद्दल लोकांना अधिक आनंद वाटत असून न्याय मिळाला असे वाटत आहे, अशा भावना प्रदीप शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.

हेही वाचा - नराधमांचे एन्काऊंटर केले हे समाधानकारक, या प्रकरणाची चौकशी व्हावी - मनीषा कायंदे

ABOUT THE AUTHOR

...view details