महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BMC Employee Problems : 'या' कारणामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या हजारो मुलांचे होणार शैक्षणिक नुकसान

मुंबई महापालिकेच्या सफाई विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या (Employees working cleaning department BMC) वसाहती धोकादायक असल्याने रिक्त केल्या जात आहेत. यामुळे पालिका सफाई कामगारांच्या सुमारे सहा हजार मुलांना शालेय शैक्षणिक वर्ष अर्धवट सोडावे लागणार (Colonies and education of children are in danger) आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष संपल्यावर इमारती रिक्त करण्याची मागणी केली जात आहे. BMC Employee Problems

BMC Employee ProblemsBMC Employee Problems
शैक्षणिक नुकसान

By

Published : Dec 9, 2022, 5:08 PM IST

मुंबई :मुंबई महापालिकेच्या सफाई विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या (Employees working cleaning department BMC) वसाहती धोकादायक असल्याने रिक्त केल्या जात आहेत. या इमारती डिसेंबरमध्ये रिक्त केल्या जात असून, त्याबदल्यात तुटपंजे भाडे दिले जाणार आहे. यामुळे पालिका सफाई कामगारांच्या सुमारे सहा हजार मुलांना शालेय शैक्षणिक वर्ष अर्धवट सोडावे लागणार (Colonies and education of children are in danger) आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून; मुलांचे शैक्षणिक वर्ष संपल्यावर इमारती रिक्त करण्याची मागणी केली जात आहे. BMC Employee Problems

प्रतिक्रिया देतांना मुंबई महापालिका सफाई कर्मचारी

मुलांच्या शिक्षणाचे होणार नुकसान :मुंबई महानगरपालिकेत २९ हजार ६१८ सफाई कामगार काम करत आहेत. या सफाई कामगारांसाठी पालिकेने मुंबईत ४६ वसाहती बांधल्या होत्या. त्यात सुमारे ६ हजार सेवा निवासस्थाने होती. त्यापैकी काही सेवा निवासस्थान असलेल्या इमारती धोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. ४६ पैकी ३६ वसाहतीमधील ४५०० सेवा निवासस्थाने इमारती धोकादायक झाल्याने, १५ ते २१ डिसेंबरपर्यंत रिक्त करण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे. या इमारती रिक्त केल्यावर कामगारांना १४ हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. मात्र इतक्या कमी भाड्यात मुंबईमध्ये आपण राहात असलेल्या विभागात घर कसे मिळणार? असा प्रश्न कामगारांना सतावत आहे. एकीकडे पालिकेने दिलेल्या भाड्याच्या रकमेत घर मिळणार नसल्याने परवडेल अशा ठिकाणी भाड्याच्या घरात जावे लागणार आहे. यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.



विद्यार्थ्यांचा विचार करावा :मुंबईमध्ये बहुतेक सर्व परीक्षा एप्रिलमध्ये होतात. या परीक्षा होईपर्यंत वसाहती खाली करू नये. एखादी इमारत खूपच धोकादायक झाली असल्यास, तेथील कामगारांना स्थलांतरित करावे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने पालिकेने कामगारांना त्याच जागेवर ट्रान्झिट कॅम्प बांधून तात्पुरते निवासस्थान द्यावे, जेणे करून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्यामुळे पालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी अशोक जाधव यांनी केली आहे.



तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलन :१८ नोव्हेंबर व २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत पालिका सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेद्वारे मालकी हक्काची घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी १२ डिसेंबर रोजी सर्व २४ विभाग कार्यालयावर कामगारांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. १४ डिसेंबर रोजी विभागवार धरणे आंदोलन, १९ डिसेंबरपासून प्रत्येक वसाहतीमध्ये थाळीनाद आणि धरणे आंदोलन, तसेच २१ डिसेंबर पासून सर्वपक्षीय माजी नगरसेवक, विद्यमान आमदार व खासदार यांच्या घरी जाऊन मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतरही दाद मिळाली नाही तर, थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मूक मोर्चा घेऊन जाऊ, असा इशारा अशोक जाधव यांनी दिला आहे.



६९ कामगारांचा मृत्यू :माझगांव येथे असलेली बाबू गेणू ही इमारत २७ सप्टेंबर २०१३ साली, रात्री ५.३० वाजता कोसळली. त्यामध्ये ६९ कामगारांचा मृत्यू झाला. इमारत कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. त्यानंतर करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये सफाई खात्याच्या कामगारांना दिलेल्या ४६ वसाहतीपैकी ३६ वसाहती मोडकळीस आल्या आहे. त्या नव्याने बांधण्याची गरज असल्याचे समोर आले. २०१५ मध्ये इमारती पुनर्विकास करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. २०२२ मध्ये काही वसाहतींचे भूमिपूजन करण्यात आले आहे. काही इमारतींचे ३ ते ४ मजल्यापर्यंत बांधकाम झाले आहे. सिध्दार्थनगर बाप्टीरोड येथील दोन इमारती २० माळ्याच्या तयार झालेल्या आहेत, अशी माहितीही अशोक जाधव यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details