मुंबई - मध्य, हार्बर रेल्वे स्थानकावरील फलाट, पादचारी पुलावरील छताची डागडुजी करण्याची कामे चालू आहेत. छताची डागडुजी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात होत असल्याने जागोजागी रेल्वे स्थानकावरील प्रवासी पुलाचा, फलाटावरील दुकानाचा काही वेळासाठी उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी आसरा घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकावरील छताच्या कामात कामगार विना सुरक्षा काम करीत असल्याचे दिसून येत आहे. काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन स्वीकारेल का? हा प्रश्नच आहे.
मानखुर्द रेल्वे स्थानकावरील छताच्या कामात कामगार विनासुरक्षा छतावर - safety apparatus
मानखुर्द रेल्वे स्थानकावरील छताच्या कामात कामगार विना सुरक्षा काम करीत असल्याचे दिसून येत आहे. काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन स्वीकारेल का? हा प्रश्नच आहे.
मानखुर्द रेल्वे स्थानक हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. येथे 2 फलाट व 3 पादचारी पूल आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन्ही फलाटावरील छताची डागडुजी करण्यात आली असून नवीन रंगाचे लोखंडी पत्रे बसवण्यात आले आहेत. कुर्ला दिशेकडील पादचारी पुलाचे छताचे काम चालू आहे. त्या कामासाठी छताच्यावर 3 कामगार विना सुरक्षा लोखंडी पत्रे बसवत आहेत. ना डोक्यावर सुरक्षा हेल्मेट आहे, ना सुरक्षा जाळी. छताच्या खालील बाजूने महिला, पुरुष, लहान मुले, अपंग प्रवासी मानखुर्द स्थानकातून पूर्व पश्चिम या दोन्ही दिशेने जात आहेत. त्यामुळे धोका छतावरील काम करणाऱ्या कामगार आणि खालील बाजूने जात असलेले प्रवाशी दोघांनाही आहे.