मुंबई - महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांची निवडणूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. या निवडणुकांपूर्वी समित्यांमधील नगरसेवकांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही जुने चेहरे कायम ठेवण्यात आले आहेत. स्थायी समितीमधून शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य, भाजपच्या माजी उप-महापौर अलका केरकर, सुधार समितीमधून भाजपचे प्रकाश गंगाधरे यांना बदलून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
माजी महापौरांसह उपमहापौरांना स्थायी समितीमधून हटवले, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक
या निवडणुकांपूर्वी समित्यांमधील नगरसेवकांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही जुने चेहरे कायम ठेवण्यात आले आहेत.
विशेष समित्यांच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत आहेत. या निवडणुकांपूर्वी समित्यांमधील अर्धे नगरसेवक, सदस्य निवृत्त होतात. त्या जागी नव्या सदस्यांची नेमणूक केली जाते. शिवसेनेकडून सदानंद परब, माजी महापौर मिलिंद वैद्य, समिक्षा सक्रे यांना यांना स्थायीमधून इतर समित्यांमध्ये सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे. या जागी किशोरी पेडणेकर, चंद्रशेखर वायंगणकर, विजेंद्र शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून माजी महापौर अलका केरकर यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी ज्योती अळवणी यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून कमरजहाँ सिद्दीकी यांच्या जागी विठ्ठल लोकरे यांना संधी देण्यात आली आहे.
सुधार समितीमध्ये शिवसेनेचे संतोष खरात, सदानंद परब, किरण लांडगे भाजपाकडून शीतल गंभीर, स्वप्ना म्हात्रे, रोहन राठोड, अतुल शाह, अभिजित सामंत, मुमताज खान यांना संधी देण्यात आली आहे. शिक्षण समितीत भाजपच्या सुरेखा पाटील, पंकज यादव, शिवसेनेचे मिलिंद वैद्य, शिक्षण समितीमधील मनसेचे सदस्य कमी झाल्याने त्या जागी समाजवादी पक्षाला आपला एक सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळाली आहे. या जागेवर समाजवादीचे रईस शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बेस्ट समितीमध्ये अतुल शाह, सरिता पाटील यांच्या जागी प्रकाश गंगाधरे, मीनल पटेल यांची तर शिवसेनेच्या राजेश कुसळे यांच्या जागी राम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.