मुंबई- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. सर्वच पक्ष कामाला लागेल आहेत. मात्र मनसेचे अजूनही काही ठरलेले नाही. त्यात मनसे निवडणूक लढणार नाही. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात आहे. ऐवढेच नाही तर मनसेचे अस्तित्वच संपले आहे. यानंतर मनसे हा पक्षच नगण्य असेल. त्याची दखलही घेतली जाणार नाही असे म्हणारा राजकारणातला मोठा गट आहे. पण इतिहासात डोकावून पाहिले असता, इतिहास हा मनसेच्या बाजूने आहे. त्यामुळे जर हा काळ मनसेसाठी वाईट असला तरी तो सदासर्वदा असणार नाही, हे इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येते.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसेही शिवसेनेसारखीच संघटना. त्यांचे कार्यकर्तेही शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एक कलमी अंमल. बाळासाहेबच राज यांचे आयडॉल. राज यांची काम करण्याची शैलीही बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक आणि एक कलमी...मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणे हा दोन्ही पक्षांचा अजेंडा. ही झाली दोन्ही पक्षातील साम्य.
हेही वाचा - कुमार सानू यांच्या आवाजाची आजही चाहत्यांवर भूरळ, आजही हिट आहेत 'ही' रोमॅन्टिक गाणी
आज जी मनसेची स्थिती आहे तीच स्थिती आणीबाणी आणि त्यानंतरच्या काळात शिवसेनेची झाली होती. त्यांचे अस्तित्वच संपले अशी अवस्था होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सध्या ईडीची भिती दाखवली जात आहे. त्यामुळेच ते शांब बसले आहेत. आणीबाणीवेळी बाळासाहेबांना इंदीरा गांधीनी अशाच पद्धतीने दबाण आणला होता असे राजकीय विश्लेशक सांगतात. त्यातूनच त्यांनी आणीबाणीला समर्थ केलं होतं. मात्र आणीबाणी नंतर शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली. आणीबाणीनंतरच्या निवडणूकीत काँग्रेसची वाताहत झाली. शिवसेनेचीही तीच स्थिती झाली. सेना फक्त मुंबई महापालिके पुरती शिल्लक राहिली.