मुंबई - उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे पोलीस बंदोबस्तात नियोजित मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन आणि मतदानासाठी लागणारे साहित्य होते.
उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ : निवडणूक अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर दाखल
महानगरपालिका शाळा क्रमांक १ आणि हिंदी माध्यमिक विद्यालय येथे झोन क्रमांक पाच अंतर्गत २८, २९, ३०, ३१, ३३ आणि ३४ या मतदान केंद्र क्रमांकावर निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी मतदान यंत्र घेऊन पोलीस बंदोबस्त पोहोचले.
निवडणूक अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर दाखल
विक्रोळी पार्क साईट घाटकोपर हा परिसर पश्चिम मतदारसंघात येतो. त्यामुळे महानगरपालिका शाळा क्रमांक १ आणि हिंदी माध्यमिक विद्यालय येथे झोन क्रमांक पाच अंतर्गत २८, २९, ३०, ३१, ३३ आणि ३४ या मतदान केंद्र क्रमांकावर निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी मतदान यंत्र घेऊन पोलीस बंदोबस्त पोहोचले. महापालिका शाळा क्रमांक एकमध्ये आज दुपारी खासगी बसमधून निवडणूक कर्मचारी व पोलीस कर्मचारी विक्रोळी पार्क साईट मतदान केंद्रावर पोहोचले .