मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 आॅक्टोबरला मतदान तर 24 आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. 125-125 जागांचा प्रस्ताव आघाडीने मंजूर केला आहे. त्यामुळे आता कोण्त्या जागा कोणाकडे राहणार यावरून पुन्हा आघाडीत बिनसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, असे काही मतदारसंघ आहेत जिथे शरद पवार यांच्या हट्टासाठी याचा फटका काँग्रेसला बसला आहे.
हेही वाचा - हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?
इंदापूर मतदारसंघ -
तेव्हाचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. हर्षवर्धन पाटील हे येथून सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेसक़डे होती. त्यावेळी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांनी ही निवडणूक लढवली व ते आमदारही झाले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे लढले होते. त्यावेळी इंदापूरमध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील तर, राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे हे रिंगणात होते. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला होते. तर, हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
हेही वाचा - पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?
दरम्यान, 2014 विधासभेनंतर याठिकाणी कायमच काँग्रेसला राष्ट्रवादीने डावल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. त्याचे परिणाम राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला जास्त सहन करावे लागत आहेत. दत्तात्रय भरणे यांच्या विजयानंतर इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसे आरोपही हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर केले आहेत.
लोकसभेत हर्षवर्धन पाटलांची सुप्रिया सुळेंना मदत -
लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी आघाडीचा धर्म पाळावा आणि सुप्रिया सुळे यांचा प्रचार करावा म्हणून शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली होती. तर अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना ७० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्यात काँग्रेसचा वाटा मोठा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.