महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीतील 5 ग्रामपंचायतींसाठी 6 फेब्रुवारीला होणार मतदान - ratnagiri grampanchayat election declared latest news

रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या 5 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी होणार, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

state election commission
राज्य निवडणूक आयोग

By

Published : Jan 3, 2020, 2:51 AM IST

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या 5 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी होणार, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. सुकवली, बहिरवली, चौगुले मोहल्ला, रजवेल आणि शिर्शी अशी या ग्रामपंचायतींची नावे आहेत.

मदान यांनी सांगितले, मुदत संपणाऱ्या या पाच ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे 16 ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 22 जानेवारी 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 24 जानेवारी 2020 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 6 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर मतमोजणी 7 फेब्रुवारी 2020 ला होईल, अशी माहितीही मदान यांनी दिली.

हेही वाचा -शहरी नक्षलवाद्यांकडूनच सीएएचा विरोध - विनय तेंडुलकर

ABOUT THE AUTHOR

...view details