महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील हाजीअली परिसरात २ लाख ८७ हजारांची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई - पोलीस

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शहरातील हाजीअली परिसरात शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत तब्बल २ लाख ८७ हजार ५५० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा जसजसा जोर धरत आहे तसतसा प्रत्येक दिवशी अनधिकृत पैशांवर निवडणूक आयोगाची कडक कारवाईही वाढत आहे.

हाजीअली परिसरात २ लाख ८७ हजारांची रोकड जप्त

By

Published : Apr 21, 2019, 5:02 PM IST

मुंबई- निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शहरातील हाजीअली परिसरात शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत तब्बल २ लाख ८७ हजार ५५० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा जसजसा जोर धरत आहे तसतसा प्रत्येक दिवशी अनधिकृत पैशांवर निवडणूक आयोगाची कडक कारवाईही वाढत आहे.

हाजीअली परिसरात २ लाख ८७ हजारांची रोकड जप्त

मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे अधिकारी जयप्रकाश जगताप यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे हाजी अली सिग्नलजवळ वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी दुचाकी वाहन चालक प्रतिक राकेश शहा याच्या (एम.एच. ०२ सी. एम. ०४७७) दुचाकी वाहनाच्या डिक्कीमधील बॅगेत २ लाख ८७ हजार ५५० रुपये इतकी रक्कम आढळून आली. या संदर्भात प्रतीक शहा यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details