महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Father Beaten By Daughter: मला माझ्या मुलीपासून वाचवा; वृद्ध वडिलांनी पोलिसांकडे मागितली मदत - वडिलांना मुलीकडून मारहाण

Father Beaten By Daughter: आजच्या अत्याधुनिक जगात मुलींना मुलांप्रमाणे वाढवले जाते. (Father harassed by daughter) तसेच अनेक पालकांना वाटतं, मुलापेक्षा मुलगी बरी. (Pressuring Father to Sell Flat) मुली मुलांपेक्षा आपल्या आई-वडिलांची जास्त काळजी घेतात, असं म्हटलं जातं. पण सांताक्रूज परिसरात मुलीने आपल्या वृद्ध वडिलांचा छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे राहणाऱ्या ८१ वर्षीय कृष्ण मेहरा यांचा ४७ वर्षांची त्यांच्या पोटाची मुलगी छळ करत असून फ्लॅट विकून पैसे मिळवण्यासाठी वडिलांचा विविध प्रकारे मानसिक व शारीरिक छळ करत असल्याने वडिलांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात (Santacruz police station) तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलगी पूजा मेहरा हिला आज अटक केली आहे. (Mumbai Crime)

Father Beaten By Daughter
वृद्ध वडिलांनी पोलिसांकडे मागितली मदत

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 10:57 PM IST

मुंबईFather Beaten By Daughter: वृद्ध वडील असलेल्या कृष्ण मेहरा यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 1972 मध्ये मधू नावाच्या महिलेशी त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर त्यांना दोन मुले होती. राज मेहरा आणि पूजा मेहरा. पत्नी मधू 2005 मध्ये कॅन्सरमुळे मरण पावली. त्यानंतर 2006 मध्ये मुलाने वांद्रे येथील एक प्लॉट विकून वडिलांकडून त्याचा वाटा घेतला. नंतर तो पत्नी आणि मुलांसह वेगळे राहायला गेला. उर्वरित रकमेतून मेहरा यांनी सांताक्रूझ येथे एक फ्लॅट विकत घेतला. ज्यामध्ये ते त्यांची अविवाहित मुलगी पूजा मेहरासोबत राहत होते.

फ्लॅट विकून पैसे देण्यासाठी वडिलांकडे तगादा:कृष्ण मेहरा यांनी 2001 मध्ये त्यांची मुलगी पूजाला फॅशन डिझायनर म्हणून उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवले. तेव्हापासून पूजा लंडन आणि मुंबईत सहा-सहा महिने राहते. लंडनमध्ये स्थायिक व्हावे म्हणून पूजा गेल्या 10 वर्षांपासून तिचे वडील कृष्ण मेहरा यांना फ्लॅट विकून पैसे देण्यासाठी सतत त्रास देत आहे. वयोवृद्ध व्यक्ती मेहरा यांचा कापड छपाईचा व्यवसाय होता आणि त्यातून जमवलेल्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह करत होते. पूजा जेव्हा भारतात कुठलेही काम करण्यासाठी येते तेव्हा ती वडिलांच्या डेबिट कार्डमधून पैसे काढून खर्च करते, असे वृद्ध वडिलांनी म्हटले आहे.

मुलीकडून वडिलांना मारहाण:या वृद्ध तक्रारदाराने सांताक्रूझ पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी गेल्या 10 वर्षांपासून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे. या वृद्धाने फेब्रुवारी 2019 मध्ये दोनदा पोलीस ठाण्यात एनसी देखील दाखल केली आहे. अनेकवेळा आपल्या मुलीच्या अत्याचाराला कंटाळून वृध्दाला गाडीत झोपून रात्र काढावी लागली. आपला मुलगा आणि मुलगी दोघेही आपली काळजी घेत नाहीत, असे या वृद्धाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. मुलीने वडिलांना अनेक वेळा मारहाण करून बेडवरून खाली ढकलले. त्यामुळे वृद्धाच्या डोक्याला दुखापत देखील झाली आहे. पूजाने तिच्या वडिलांच्या फ्लॅटची कागदपत्रेही आपल्या ताब्यात ठेवली आहेत. गेल्या ५ महिन्यांपासून तक्रारदार वृद्धाला हॉटेलमध्ये राहून वेळ काढावा लागत आहे. पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले की, आम्ही गुन्हा दाखल केला आहे. त्याची लवकरच चौकशी केली जाईल. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मुगुटराव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, पूजा हिला या गुन्ह्यात आज अटक केली असून न्यायालयात हजर केले असता तिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

  1. Govt Officials Fake FB Account: शाहरुख खानचा कारनामा; शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक
  2. Drugs Factory Destroyed: ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाचा ड्रग्ज कारखाना उध्वस्त; १३५ किलो एम डी ड्रग्ज जप्त
  3. Cyber Fraud: देवेंद्र फडणवीसांच्या खासगी सचिवाच्या नावे सायबर फ्रॉड; आरोपीला मिरजमधून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details