मुंबई : विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आमदार एकनाथ खडसे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे पत्र आपण विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांना यापूर्वीच दिले होते, अशी माहिती आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. मात्र त्या पत्रावर कोणतीही कारवाई न करता, विधान परिषदेकडून आपल्याला एक पत्र प्राप्त झाले आहे. त्या पत्रामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेते आणि प्रतोदपदी रिक्त असलेल्या जागी नियुक्ती करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
पत्रात लिहीले की, एकनाथ शिंदे गटनेते : या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात येत असून; प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे. आपण दिलेल्या पत्रावर कुठलीच कारवाई न करता, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे कसे काय पत्र काढले आहे आणि वेबसाईटवरही ते कसे टाकले गेले आहे?, जयंत पाटीलांनी उपस्थित केला प्रश्न.
माझेही गटनेतेपद धोक्यात : दरम्यान असे असेल तर माझेही विधानसभेतील गटनेते पद धोक्यात आले आहे असे समजावे का? नागालँड चा मुख्यमंत्र्यांप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही सर्वपक्षीय नेते झाले आहेत का? देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच बदलले आहेत. ते आणखीन सर्व पदे बदलणार आहेत का? अशी मिशकील टोलेबाजी यावेळी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.