महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MCA Election: एकनाथ शिंदेचा टोला, पवारांसोबत आम्हाला पाहुन त्यांची झोप उडाली असेल

मुंबई क्रिकेट संघटनेची (mumbai cricket association) त्रैवार्षिक निवडणूक (MCA election) आज होणार असून, काल निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात एकनाथ शिंदे (eknath shinde), देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि शरद पवार (sharad pawar) एकत्र आले होते.

स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Oct 20, 2022, 12:59 PM IST

मुंबई:मुंबई क्रिकेट संघटनेची (mumbai cricket association) त्रैवार्षिक निवडणूक (MCA election) आज होणार असून, काल निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) एकत्र आले होते. यादरम्यान झालेल्या भाषणात तिघांनी मोठ्या प्रमाणात राजकीय फटकेबाजी केली. भाषणादरम्यान शिंदे यांनी पवार, फडणवीस व मला एकत्र पाहून अनेकांची झोप उडेल, असा अप्रत्यक्ष टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी:महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका व्यासपीठावर आले होते. भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी कुणाचंही नाव घेतले नाही, मात्र त्यांचा रोख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री? : पवार फडणवीस व मी एकाच व्यासपीठावर आलो त्यामुळे काही लोकांची रात्रीची झोप उडू शकते. पण ही राजकारण करण्याची जागा नाही. आम्ही सर्वजण खेळांचे प्रशासक व समर्थक आहोत. त्यामुळे आम्ही आपसातील राजकीय मतभेद विसरून विकासासाठी एकत्र आलो आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शरद पवार यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात : निवडणूकीकरिता जमलेल्या सभेत जेष्ठ नेते या नात्यानं शरद पवार यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी मार्मिक पण मिश्किल फटकेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. वानखेडे स्टेडियमची लीज मुदत संपली आहे ती वाढवून मिळावी तसेच मैदानाच्या सुरक्षासाठी कायदा सुव्यवस्था करिता जनतेकडून वसुली करू नये असे म्हणताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. चटकन शरद पवार यांनी म्हटले, परवा बीकेसीमध्ये जी सभा घेतली. त्यात सुरक्षासाठी जनतेकडून वसुली केली गेली. खेळाचे मैदान त्याची सुरक्षा कायदा सुव्यवस्था ही शासनाची जबाबदारी आहे याचे शासनाने भान असू द्यावे, असा वडीलकीचा सल्ला देखील दिला. या उत्तराने सभागृहात 2 मिनिटं हास्याचे कारंजे उडत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details