मुंबई- राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनाही घडत आहेत. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागून झाली असून शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे तसेच शासकीय मदतीची प्रक्रिया थंडावली आहे. आम्ही सत्ता स्थापनेसाठी वेळ वाढवून मागितली तर वेळ वाढवून न देता त्यांनी ताबडतोब आमची मागणी फेटाळली. ज्या पद्धतीने त्यांनी त्यावेळी ताबडतोब निर्णय घेतला त्याप्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचाही निर्णय ताबडतोब घ्यावा, असे वक्तव्य आमदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीसाठी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेने राजभवनावर मोर्चा काढला. त्या मोर्चाला भेट देत बच्चु कडूंशी चर्चा करण्यासाठी आले असता आ. शिंदे बोलत होते. यावेळी सचिन अहिर, अनिल परब यांनी ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.