मुंबई :लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपने जागा वाटपाचा फॉर्म्युला ही ठरवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
११ महिन्यांपासून विकासाचे विविध निर्णय : राज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. आगामी काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बैठकीनंतर व्यक्त केला.
Maharashtra Politics: आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार, बहुमताने जिंकणार- दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दावा - CM Eknath Shinde
लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपचा अजेंडा ठरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. दरम्यान, राज्यातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार आणि बहुमताने जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. आमची युती भक्कम असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू : मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू आहेत. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
हेही वाचा :