मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी शिवाजी पार्क येथील मैदानात दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारशी मनसेची वाढत चाललेली जवळीक बघता या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दीपोत्सव कार्यक्रमाला शिंदे फडवणीस यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.
Shinde Fadnavis at Deepotsav : राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाला शिंदे फडणवीस राहणार उपस्थित - attend Raj Thackerays Deepotsav in mumbai
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार ( Mumbai BJP President MLA Ashish Shelar ) यांनी मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानंतर आता मुंबई भाजपा तर्फे मुंबईत दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईत ते बोलत होते.
जे दुसऱ्याच्या यशअपशावर सदैव जळत राहतात, ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार ? असा राजकीय टोला लगावत भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार ( Mumbai BJP President MLA Ashish Shelar ) यांनी मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानंतर आता मुंबई भाजपा तर्फे मुंबईत दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार ( Diwali celebrated in Mumbai ) असल्याचे सांगितले आहे. मुंबईत ते बोलत होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजन :आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात मोर्चेबंदी करायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार सर्वच राजकिय पक्षांनी दिवाली पहाट, दीपोत्सव आणि कार्यक्रमांच, विविध स्पर्धांचं आयोजन सुद्धा केलेले आहे. एकीकडे भाजप व मनसेने मोठ्या प्रमाणात दीपावली कार्यक्रमाचे आयोजन केले असले तरीसुद्धा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या तरी पक्षातर्फे असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही आहे. परंतु स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये आमदार, कार्यकर्ते हे अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. साहजिकच मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी ही चढाओढ सुरू असल्याचे चित्र असून मतदारांबरोबर कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांंबरोबर गिफ्टची मेजवानीही यंदा जोरात दिसणार आहे.