महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महालक्ष्मी एक्सप्रेस: सर्व प्रवाशी सुखरुप, बचावकार्य सुरुच - एकनाथ शिंदे - कल्याण,

मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. यामध्ये ७०० हून प्रवाशी अडकले होते. आत्तापर्यंत ५०० हून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

एकनाथ शिंदे

By

Published : Jul 27, 2019, 3:00 PM IST

ठाणे - मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. यामध्ये ७०० हून अधिक प्रवासी अडकले होते. आत्तापर्यंत 600 पेक्षा जास्त प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ परिसरात शुक्रवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे.

एकनाथ शिंदे

एक्स्प्रेसमधून बाहेर काढलेले सर्व प्रवासी सुखरुप आहेत. बाकी प्रवाशांनाही बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बचावकार्यासाठी नौदलाची ८ बचाव पथके, ३ पाणबुड्यांची पथके आणि एक सी -किंग हेलिकॉप्टर घटनास्थळी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details