मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. खडसेंच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्र आणि बहुजन समाज पक्षातील एक मोठा मतदारवर्ग राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या प्रवेशाच्या नेमक्या काही मिनिटांपूर्वी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाली. ही बैठक प्रदीर्घ चाचल्याने खडसेंच्या प्रवेशाला सुमारे तासभर विलंब झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सध्या कॉरंटाईन असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. पण, त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली. या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठीच्या मदत पॅकेजची घोषणा केली. यामुळे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचे दिसून आले.
शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची चर्चा
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशापूर्वी शरद पवार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची वाय. बी. सेंटरला महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक बराच काळ चालल्याने खडसेंच्या प्रवेशाला विलंब झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित होते. शरद पवार या कार्यक्रमाला कधी येतात याची आतुरतेने वाट बघत होते. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सध्या गृहनिर्माणमंत्रीपद आहे. त्यांना राष्ट्रवादीत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असून हे मंत्रिपद खडसेंकडे जाणार असल्याचे सांगितले जात होते. या विषयावरच पवार आणि आव्हाडांची चर्चा झाल्याचे चर्चेत होते. पण खडसेंच्या प्रवेशानंतर पवार यांनी जाहीर केले की मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही.
अजित पवार यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती
अजित पवार यांना कोरोना झाला असल्याचे वृत्त काल काही माध्यमांमध्ये उमटले होते. मात्र, अजित पवार यांचा मुलगा पार्थ याने लगेच ट्विट करून कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट केले. सध्या अजित पवार घरीच विलगीकरणात आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहले नाही, अशी चर्चा आहे. पण यावर कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
मुख्यमंत्र्यांची आयत्या वेळी पत्रकार परिषद
एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयत्या वेळी ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. एवढी मोठी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन केली जाईल, असे अपेक्षित होते. पण, अशा अचानक घोषणेने उद्धव यांची नाराजी समोर आली. एकनाथ खडसे यांना कृषिमंत्रीपद दिले जाईल, असा कयास सुरुवातील लावण्यात येत होता. पण, शिवसेना हे मंत्रीपद सोडायला सध्या तयार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला जितेंद्र आव्हाड यांचा बळी द्यावा लागण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडीवर प्रहार