मुंबई- हेतूपुरस्सर मला, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर अशा काही जणांना प्रचारादरम्यान बाहेर ठेवण्यात आले. त्याच्यामुळे निश्चितच पक्षाला फटका बसला आहे, असा भाजपला घरचा आहेर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. तसेच अजित पवार यांच्या विरोधातील बैलगाडीभर पुरावे आम्ही रद्दीत विकले, अशी टीकाही खडसेंनी केली आहे.
हेही वाचा - अजित पवारांच्या पाठिंब्याबद्दल वेळ आल्यावर बोलेन - देवेंद्र फडणवीस
तावडे, बावनकुळे आणि मला बाजूला ठेवल्याने भाजपच्या 25 जागा कमी आल्या -
चंचंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि मला सोबत घेऊन चालले असते, तर 20 ते 25 जागांचा फरक निश्चितच पडला असता, असाही दावा खडसे यांनी केला आहे. 2014 मध्ये युती तोडण्याचा सामूहिक निर्णय झाला होता. पण विरोधी पक्षनेता म्हणून ते जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मात्र, परत 6 महिन्यांनी चूक दुरुस्त करत सेना-भाजप सरकारमध्ये एकत्र आले. 2019 मध्ये महायुतीला मतदान करत जनतेने 161 आमदारांना निवडून देत सेना-भाजपला बहुमत दिले. परंतु, दुर्दैवाने मुख्यमंत्रिपद कोणाला आणि किती वर्षे यावर एकमत न झाल्याने सेना-भाजप वेगळे झाले, असे खडसेंनी सांगितले.
हेही वाचा -आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?