मुंबई - आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्टचा आज(5 जानेवारी) शेवटचा दिवस होता. यावर्षीच्या टेकफेस्टचे खास आकर्षण असलेल्या हाँगकाँग येथील 'आइन्स्टाइन रोबोट'ने समोरोपीय कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. त्याने "मी प्रथमच मुंबईत आलो असून मला अल्बर्ट आइन्स्टाइनचे गणिती अनुकरण करण्यास फार आवडते" असे म्हणताच सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.
मुंबई : आयआयटी टेकफेस्टमध्ये 'आइन्स्टाइन रोबो'ने उपस्थितांशी साधला संवाद
हाँगकाँग येथील 'हॅन्सन रोबोटिक्स' या कंपनीने हा मानवी रोबो बनवला आहे. या रोबोला पाहण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमींसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याने "मी प्रथमच मुंबईत आलो असून मला अल्बर्ट आइन्स्टाइनचे गणिती अनुकरण करण्यास फार आवडते" असे म्हणताच सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.
हेही वाचा -मुंबई आयआयटी टेकफेस्टमध्ये नाशिकची 'एअर टॅक्सी'
हाँगकाँग येथील 'हॅन्सन रोबोटिक्स' या कंपनीने हा मानवी रोबो बनवला आहे. या रोबोला पाहण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमींसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. हा रोबोट प्रशिक्षित असून त्याला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखता येतात. तो व्यक्तीच्या भावना ओळखून ती स्त्री आहे की पुरुष हे सांगू शकतो. या टेकफेस्टच्या माध्यमातून विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीला चालना देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.