मुंबई :मुंबईतील आठ वर्षाच्या कियान भट्टने सलग ३१ मिनिटे आणि ३८ सेकंद तबला वादन करत इतिहास रचला ( Eight year old Kian Bhatt made history )आहे. त्याने मुलांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे कियानचे आजोबा कांती भट हे स्वतः गायक असून विविध आर्केस्ट्रामध्ये ते गात असतात व कधीकधी कियानची तबल्यावर त्यांच्याबरोबर जुगलबंदी सुद्धा रंगते.
तबला शिकवायला कोणी तयार नव्हतं :मुंबईत, कांदिवली येथे राहणाऱ्या व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आंतरराष्ट्रीय स्कूल, बोरवली येथे शिकणाऱ्या आठ वर्षीय कियान समीर भट याने सलग ३१ मिनिटे आणि ३८ सेकंद तबलावादन ( thirty one minutes and thirty eight seconds )करत मुलांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. कियानला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वास्तविक याविषयी बोलताना कियान सांगतो की, त्याला संगीताची आवड होती, पण तबला वाजवायची आवड नंतर निर्माण झाली. वयाच्या साडेचार वर्षांपासून त्यांने तबला वाजवायला सुरुवात केली. परंतु जेव्हा त्याचे वडील त्याच्यासाठी तबलावादनासाठी कोच किंवा एखादी शाळा शोधत होते तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की वयाची आठ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्याला कुठेही तबला वाजवता येणार नाही. परंतु कियान ला विशाल मेहेर नावाने एक प्रशिक्षक भेटले व त्यांनी कियान ला घडवायला सुरुवात केली. वयाच्या साडेचार वर्षापासून ८ वर्षापर्यंत म्हणजे साडेतीन वर्षांमध्ये कियान ने एक इतिहास रचला.