मुंबई :पश्चिम रेल्वेवर सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्या लोकांसाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करणारे जनतेसाठी खास विशेष आठ लोकल ट्रेन (Eight Special Local Trains) जादा सोडल्या जाणार आहे. परिणामी पश्चिम रेल्वेवरील प्रवास करणाऱ्या जनतेस याचा लाभ (31st December and 1st January midnight) होईल.
ट्रेन सोडण्याचा निर्णय :दोन वर्ष कोरोना महामारीमुळे कोणतेही सण साजरे करता आले नाही. दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्र इतर सहामाही वार्षिक सण उत्सव यामध्ये देखील जनतेने आनंदाने उत्साहाने भाग घेतला नाही. मात्र 31 डिसेंबर तोंडावर आलेला आहे. त्यामुळेच या उत्सवासाठी पश्चिम रेल्वेने विशेष आठ लोकल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला (trains will run on Western Railway) आहे.
लोकल ट्रेनची सोय :पश्चिम रेल्वेच्या मार्गावर 79 एसी लोकल मिळून आता 1383 लोकल ट्रेन पश्चिम रेल्वेवर प्रतिदिन धावत आहेत. लाखो प्रवासी रोज पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करतात. बहुतेक प्रवासी चर्चगेट आणि दादर इथपर्यंत येतात. 31 डिसेंबरच्या निमित्ताने होणारी गर्दी दादर, मरीन लाईनची चौपाटी वांद्रे अंधेरी अशा ठिकठिकाणी 31 डिसेंबरच्या निमित्ताने वेगवेगळ्या उत्सवाचे आयोजन झालेले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणी येण्या जाण्यास सोयीचे व्हावे म्हणून पश्चिम रेल्वेकडून या विशेष आठ लोकल ट्रेनची सोय करण्यात आलेली (Eight special local trains will run) आहे.