मुंबई -येथील विलेपार्ले भागात पोलीस असल्याची थाप मारत पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकण्याच्या नावाखाली 12 कोटी रुपये घेऊन फरार झालेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत छापा टाकला. यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या दोघांची तपासणी करत त्यांच्याकडील 12 कोटी रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते.