मुबंई : देशातील सर्व राज्यांमध्ये रोजेदार ईदच्या सण साजरा केला जात आहे. अनेक मशिदींमध्येही नमाज अदा केली जात आहे. तसेच मुंबईतील माहीम दर्गाह येथेही मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे.
ईदगाह मैदानावर नमाज :मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यातील ईदगाहमैदानावर शहरातील मुस्लिम बांधवांनी नमाज पडण्यासाठी गर्दी केली होती. यावर्षीची पहिली सार्वजनिक नमाजी नऊ वाजता ठेवण्यात आली होती. त्यापूर्वी मुख्य मौलाना याने मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली. या नमाजला लहान थोरासह, वयोवृद्ध, अपंग असे सर्वच मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा: ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला 'जकात' असं संबोधले जाते. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही जकात देऊन नमाज पठण करण्यास जाते. नमाजानंतर परताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असे म्हटले जाते. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते. मुस्लिम धर्माच्या उपदेशाप्रमाणे नमाज पडल्यानंतर गोरगरीब लोकांना ईदी दिली जाते. शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तसेच पुणे पोलीस अधीक्षक रितेश कुमार यांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या.