महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिसणार का महाराष्ट्राचा चित्ररथ? प्रशासनानं दिलं 'हे' उत्तर - Maharashtra Chitrarath

Maharashtra Chitrarath २०२४ : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात विविध राज्यांकडून चित्ररथ सादर केले जातात. पण, महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा अजूनही परवानगी मिळालेली नाहीय. मात्र, याबाबत प्रशासनाशी संवाद सुरू असून यात यश मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सांस्कृतिक विभागानं दिली आहे.

Maharashtra Chitrarath
महाराष्ट्र चित्ररथ

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 4:40 PM IST

मुंबई Maharashtra Chitrarath २०२४ :प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या राजपथावरील संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच लक्षणीय ठरत असतो. यंदा महाराष्ट्राच्या वतीनं रंगभूमीच्या 175 वर्षांच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर 'या' प्रस्तावामध्ये बदल करून शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव आहे.

चित्ररथासाठी परवानगी मिळण्याची शक्यता : अद्यापही केंद्र सरकारकडून चित्ररथासाठी परवानगी मिळालेली नाही. दरवर्षी, वेळेअभावी काही विशिष्ट राज्यांनाच चित्ररथाची परवानगी मिळते. यंदा 16 राज्य, सहा केंद्रशासित प्रदेशांना चित्ररथ सादर करण्याची परवानगी मिळाली आहे. चित्ररथ सादर करण्यासाठी चक्राकार पद्धतीनं राज्यांना संधी दिली जाते. गतवर्षी महाराष्ट्राला ही संधी दिली होती. पण, यावर्षी महाराष्ट्राला ही संधी दिली गेली नाही. आता 2024 साठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

'शिवराज्याभिषेक चित्ररथ' सादर करण्याचा प्रस्ताव : तरीही राज्य शासनाच्या वतीनं यंदा (2024) '350 वा विशेष शिवराज्याभिषेक' हा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव आहे. यंदा शिवराज्याभिषेकाचं 350 वे वर्ष असल्यानं विशेष परवानगी मिळावी, यासाठी अद्यापही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याशी चर्चा सुरू आहे. त्यामुळं अजूनही परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं राज्य सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या चित्ररथाची परंपरा :प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचालनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. 1980 मध्ये महाराष्ट्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक चित्ररथ सादर करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळाला होता. 1983 मध्ये महाराष्ट्रानं सादर केलेल्या बैलपोळा चित्ररथाला देखील क्रमांक मिळाला होता. त्यानंतर 1993, 1994, 1995 सलग तीन वर्ष महाराष्ट्राला अव्वल क्रमांक मिळत होता.

महाराष्ट्राला चित्ररथ सादर करण्याची संधी :2016 मध्ये महाराष्ट्रानं पंढरीच्या वारीचा चित्ररथ सादर केला होता. त्यालाही पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथालाही क्रमांक मिळाला होता. असं असून देखील यंदा सलग महाराष्ट्राला चित्ररथ सादर करण्याची संधी देता येणार नाही, असं केंद्राच्या सांस्कृतिक खात्यानं सांगितलंय. मात्र, असं असलं, तरी अजूनही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शिवराज्याभिषेकाचा विशेष चित्ररथ याचवर्षी सादर करता येणार असल्याच्या चर्चा सरकारकडून सुरू आहे.


हेही वाचा -

  1. शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, गल्लीबोळातील नेत्यांचं कोण ऐकणार - संजय राऊत
  2. पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा; विमानतळासह 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन
  3. ऐतिहासिक चित्रपटांवरुन खासदार उदयनराजेंनी अमित शाहांकडे 'ही' केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details