महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत आज लसीकरण सुरू; बाहेरील लाभार्थ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न - mumbai covid updates

आतापर्यंत 31 लाख 17 हजार 890 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या मुंबई महापालिकेकडे कोवॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही मिळून 94 हजार डोस उपलब्ध आहेत. लसींअभावी लसीकरण मोहीम थांबवण्याची वेळ महापालिकेवर अनेकवेळा आली आहे. लसींचा साठा नसल्याने गुरुवारी लसीकरण बंद होते. त्यानंतर मुंबईला 94 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यामुळे आज लसीकरण मोहीम सुरू होईल.

मुंबईत आज लसीकरण
मुंबईत आज लसीकरण

By

Published : Jun 4, 2021, 9:38 AM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण सुरू आहे. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने गुरुवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. लसीचा साठा उपलब्ध झाल्याने शुक्रवारी लसीकरण सुरू राहील. तसेच मुंबईबाहेरील लाभार्थ्यांना आळा घालून मुंबईकरांना लस दिली जाईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली.

मुंबईबाहेरील लाभार्थ्यांना लस नाही

आज लसीकरण मोहीम सुरू

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना विषाणू विरोधातील लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या सुरुवातीपासून लसीकरण केंद्रांवर मुंबईबाहेरील लाभार्थी मोठ्या प्रमाणात लस घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुंबई बाहेरील लाभार्थ्यांना आळा घालून मुंबईकरांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. मुंबईकरांना लस मिळावी यासाठी सोमवार ते बुधवार थेट लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईत येऊन लस घेणाऱ्यांना आळा बसवण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे काकानी यांनी सांगितले.

आज लसीकरण सुरू

आतापर्यंत 31 लाख 17 हजार 890 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहीमेला गती देण्यासाठी रोज 50 हजार ते 1 लाख लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दीष्ट आहे. सध्या मुंबई महापालिकेकडे कोवॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही मिळून 94 हजार डोस उपलब्ध आहेत. लसींअभावी लसीकरण मोहीम थांबवण्याची वेळ महापालिकेवर अनेकवेळा आली आहे. लसींचा साठा नसल्याने गुरुवारी लसीकरण बंद होते. त्यानंतर मुंबईला 94 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यामुळे आज शुक्रवारी लसीकरण मोहीम सुरू होईल.

लसीसाठी पाठपुरावा

मे महिन्यात मुंबईला चार ते साडे चार लाख डोस मिळाले होते. एप्रिल महिन्याच्या तुलनेने हा पुरवठा जवळ जवळ निम्मा होता. मे महिन्यात 5 लाख 23 हजार 440 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. तर एप्रिल महिन्यात 9 लाख 47 हजार नागरीकांचे लसीकरण करण्यात आले होते. मे महिन्यात काही वेळा लसीकरण बंद ठेवावे लागले होते. तसेच अनेक वेळा निर्बंधही आणावे लागले. जून महिन्यात अधिकाधिक डोस उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.

१८ वर्षावरील लसीकरणास स्थगिती

मुंबईत रोज 1 लाख नागरीकांचे लसीकरण करता येईल अशी क्षमता आहे. मुंबईला आतापर्यंत 31 लाख 17 डोस मिळाले आहेत. देशभरात 1 मे पासून 18 वर्षावरील नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र त्यामुळे लसीकरणाचा घोळ होऊ लागला. अवघ्या काही मिनीटात बुकींग होऊ लागली. अखेरीस राज्य सरकारनेच सार्वजनिक केंद्रावरील 18 वर्षावरील नागरीकांच्या लसीकरणाला स्थगिती दिल्याचे काकानी यांनी सांगितले.

हेही वाचा- म्युकरमायकोसिसमुळे 2 दिवसात 3 बळी, 2 हजार 300 कोरोनाबाधित बालकांवर उपचार सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details