महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Crop insurance : विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतील तफावत खूप मोठी - राधाकृष्ण विखे - Effective work by agriculture department

शेतकरी संख्या आणि पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्या खूप मोठी असल्याने कृषी विभागाला विमा योजनेच्या संदर्भात प्रभावी काम करावे लागेल. संबधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil ) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ( Farmers away from crop insurance )

Effective work by agriculture department
विमा योजनेसाठी कृषी विभागाने प्रभावी काम करा

By

Published : Dec 5, 2022, 10:05 AM IST

Updated : Dec 5, 2022, 11:21 AM IST

अहमदनगर :पिकविम्यापासून शेतकरी दूर ( Farmers away from crop insurance ) जाणे हे चित्र चिंताजनक आहे. तालुक्यातील शेतकरी संख्या आणि पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतील तफावत खूप मोठी असल्याने कृषी विभागाला विमा योजनेच्या संदर्भात प्रभावी काम करावे लागेल. सरकारी प्रकल्पांना गौण खनिजांची कोणतीही अडचण येणार नाही यासाठी संबधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


विविध विभागांची बैठक : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दि. 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी महसूल कृषी महाविरण आणि पुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा जाणून विभागात असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.


लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित :बैठकीस आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लंपीवर युद्धपातळीवर काम करा :पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील खाण पट्टयामधून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणत विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या खनिजासाठी महसूल विभागाकडून रीतसर परवानगी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी पशु धनातील लंपीत्वचा आजार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पीकविमा, अन्नधान्य वितरण, वीज वितरण आदी विषयांचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावाही घेतला.


पालकमंत्र्यांच्या जनता दरबार :जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबारचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची निवेदने स्वीकारत त्यांच्या असलेल्या अडी-अडचणी, असलेले प्रश्न ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Dec 5, 2022, 11:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details