महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

IIT Bombay Student Suicide Case: आयटी मुंबईमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भयाण शांतता; दर्शन सोळुंकेच्या मृत्यूबाबत निषेध

मुंबईमध्ये दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने त्याचा जीव गेला. दर्शन सोळंके प्रथम वर्ष इंजिनिअरिंगला शिकत असताना त्याला जातीवरून भेदभावाची वागणूक मिळाली होती. याबाबत त्याने त्याच्या सोबतच्या मित्राला सांगितले होते. त्यामुळे आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल यांच्यावतीने आयटी मुंबई एससीएसटी सेलकडे याबाबतचे निवेदन दिले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च देखील काढला आहे.

IIT Bombay Student Suicide Case
दर्शन सोळुंकेच्या मृत्यू बाबत निषेध

By

Published : Feb 14, 2023, 10:43 AM IST

Updated : Feb 14, 2023, 12:50 PM IST

मुंबई:मुंबई सारख्या प्रगत अभियांत्रिकी शिक्षण संस्थेमध्ये चार वर्षांमध्ये दोन दलित विद्यार्थ्यांनी तणावाखाली येत आत्महत्या केली. दोन्ही घटनांमध्ये त्यांना जातीवरून भेदभावाची वागणूक मिळाली होती. आता नुकतेच दर्शन सोळंकी यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. दर्शन सोळंके याचे वडील गुजरात येथे राहत होते नंतर ते मुंबईत दाखल झाले. मात्र त्यांची परिस्थिती साधारण आहे.




भेदभावची वागणूक दिली: दर्शन सोळंकी हा अत्यंत अभ्यासू मुलगा होता. त्याला तो दलित असल्याच्या संदर्भातली भेदभावाची वागणूक दिली गेली होती. ही बाब त्याने त्याच्या वर्ग मित्रांकडे बोलून दाखवली होती. आता आयआयटी मधील काही विद्यार्थ्यांनी आणि आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल यांनी दर्शन सोळंकेला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. मात्र जाती वर्ण मिळालेली भेदभावची वागणूक ही त्याच्या मृत्यूस कारण ठरली आहे का? याची देखील चौकशी करण्याची मागणी आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल यांच्यावतीने करण्यात आली.


वैद्यकीय पातळीवर मदत:अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र, आर्थिक, मानसिक आणि वैद्यकीय पातळीवर मदत मिळावी. या संदर्भातले पत्र आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल आयटी मुंबई यांच्यावतीने, केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाला तीन महिन्यापूर्वीच 1 नोव्हेंबर 2022 रोजी दिले होते. याचा अर्थ अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना या भेदभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा संस्थात्मक जाती भेदातून झालेला खून आहे. असा आरोप आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी दर्शन सोळुंकेच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात आयटी मुंबई प्रशासनाने आणि केंद्र शासनाने हे भेदभावाची वागणूक मिळाल्या संदर्भातले सखोल वस्तुनिष्ठ चौकशी करावी. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.



मेरिटच्या नावाखाली रिझर्वेशनवर प्रवेश: विद्यार्थ्यांनी प्रशासनाला लिहिलेल्या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे की, मेरिटच्या नावाखाली रिझर्वेशनवर प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणूक आयआयटी मध्ये दिली जाते. तशा पद्धतीचा उल्लेख करून त्यांच्यावर वर्चस्व स्थापित करतात व वागणूक देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते असे देखील त्यात विद्यार्थ्यांनी म्हटलेले आहे.आयटी प्रशासनाकडून विद्यार्थ्याच्या आत्महत्याबाबत दुःख व्यक्त करण्यात आले आहे. प्रशासन त्याच्या या दुःखात त्याच्या कुटुंबीयांच्या सोबत आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे देखील प्रशासनाने म्हटले आहे. आयटी मुंबई येथील विद्यार्थ्यांना मानसिक सामाजिक जाच सहन करावा लागतो.


हेही वाचा:Mumbai Police मीराभाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा सहपोलीस आयुक्तांना फोन पोलिसांकडून तपास सुरू

Last Updated : Feb 14, 2023, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details