महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बायोमेट्रिक हजेरीतील घोटाळ्यामुळे 250 शिक्षकांचे पगार कापले; शिक्षण समितीत पडसाद - biometric

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक हजेरीमुळे पगार कापल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचे पगार कापल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालिका शाळांमधील तब्बल 250 शिक्षकांचे पगार कापले असल्याने या शिक्षकांना त्वरित दिलासा द्यावा, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दिले आहेत.

शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक

By

Published : May 29, 2019, 7:51 AM IST

मुंबई - महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक हजेरीमुळे पगार कापल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचे पगार कापल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालिका शाळांमधील तब्बल 250 शिक्षकांचे पगार कापले असल्याने या शिक्षकांना त्वरित दिलासा द्यावा, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दिले आहेत.

शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक माहिती देताना...


महापालिकेचे कर्मचारी कामाच्या वेळेत हजेरी लावून हजर नसल्याने बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या गैरहजेऱ्या लागून हजारो कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यात आले, काहींना शून्य पगार आले. बायोमेट्रिक हजेरीमुळे पगार कापले गेल्याने कर्मचारी युनियनने आंदोलनाचा इशारा दिल्यावर पगार देण्यात आले. असाच काहीसा प्रकार पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांसोबत घडला आहे.


महापालिका शाळांमधील शिक्षकांना शिकवणीबरोबरच प्रशिक्षणासह अनेक प्रशासकीय कामे शाळेबाहेर जाऊन करावी लागतात. मात्र यात अनेक वेळा बायोमेट्रिक हजेरीतील घोळामुळे शिक्षकांचा पगार कापला जातो. माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी असा प्रकार प्रतीक्षा नगर शाळेमध्ये झाल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले होते. यावेळी गेल्या काही दिवसांत 250 शिक्षकांचे प्रत्येकी 40 ते 50 हजार रुपये पगारातून कापले असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी दूर करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही नाईक यांनी दिले.


इंटरनेट सेवा सुधारणार -
ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा योग्य नसेल, अशा ठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे उपाआयुक्त मिलीन सावंत यांनी सांगितले. तर बायोमेट्रिकमधील दोषांमुळे हजेरी लागत नसल्याचे समोर आल्यास मुख्याध्यापकांकडील रजिस्टरनुसार 1 ते 13 तारखेपर्यंत हजेरीची नोंद करण्याची सुविधा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details