मुंबई : देशातील सर्वांत प्रभावी तपास यंत्रणा मानल्या जाणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या सहा वर्षांत तब्बल 1 लाख १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या अनुषंगाने एकूण ५०९५ 'ईसीआयआर' (प्राथमिक गुन्हे) नोंदवलेत. तर देशभरातून एकूण ५३२ लोकांना अटक केली आहे. राजकीय नेत्यांवरील कारवाईचा मागोवा घेतला असता एकूण १७६ राजकीय नेत्यांविरोधात ईडीने गुन्हे नोंदवले. यामध्ये आमदार, माजी आमदार, आजी व माजी खासदार आदींचा समावेश आहे.
नवाब मलिकांवरही कारवाई :17 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची दोन महिन्यांकरिता जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने कारवाई करत गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले नवाब मलिक यांच्या भेटीसाठी राजकीय मंडळी त्यांच्या निवासस्थानी गेली होती.
काय आहे गुन्ह्यांची आकडेवारी :गेल्या सहा वर्षात ईडीने एकूण 5 हजार 95 ईसीआयआर म्हणजेच प्राथमिक गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे देशभरातून एकूण 532 लोकांना अटक केली आहे. राजकीय नेत्यांवरील कारवाईचा मागोवा घेतला असता एकूण 176 राजकीय नेत्यांविरोधात ईडीने गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये नगरसेवक, स्थानिक राजकारणी, आमदार, खासदार, आजी-माजी आमदार आणि खासदार यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या सिद्धतेचे प्रमाण हे 96% असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या हजारोंवर असून प्रत्यक्ष कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली 25 प्रकरणे तर गुन्हे सिद्ध न झालेली 24 प्रकरणे आहेत. त्याचप्रमाणे मनी लॉन्ड्रींगचे गुन्हे सिद्ध झालेली 45 प्रकरणे आहेत.