मुंबई : ईडीने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवरेह सोली पूनावाला यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पनामा पेपर प्रकरणात पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. या प्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ईडीने मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील 41.64 कोटी रुपये किमतीच्या तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत. फेमा (FEMA) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळावर आहेत : झवरेह सोली पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध FEMA च्या तरतुदींतर्गत लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) च्या गैरवापराच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. झवरेह सोली पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कोव्हिशिल्ड अँटी - कोरोनाव्हायरस लस तयार करणाऱ्या कंपनीसह अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत.