मुंबई- येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील वरळी स्थित घरावर ईडीकडून शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आला. अजूनही ईडीचे अधिकारी राणा कपूर यांच्या घरात असून त्यांच्या हाती लागलेल्या काही महत्वाच्या कागदपत्रांची ते छाननी करीत आहेत. राणा कपूर यांच्या विरोधात या अगोदरच लुकआउट नोटीस काढण्यात आली आहे. ईडीकडून राणा कपूर आणि त्यांची पत्नी बिंदू यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता राणा कपूर यांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे.
येस बँक प्रकरण: चौकशीसाठी राणा कपूरला आणले 'ईडी' कार्यालयात... - राणा कपूर बातमी
येस बँकेकडून डीएचएफएल कंपनीला काही हजार कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राणा कपूर यांच्या काही नातेवाईकांच्या बँक खात्यात रक्कम वळविण्यात आली होती. यात राणा कपूर यांची पत्नी बिंदू यांच्या बँक खात्याचाही समावेश आहे.
'ईडी'चे अधिकारी अजूनही राणा कपूरच्या घरात...
हेही वाचा-येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीची छापेमारी
सूत्रांच्या माहितीनुसार, येस बँकेकडून डीएचएफएल कंपनीला काही हजार कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राणा कपूर यांच्या काही नातेवाईकांच्या बँक खात्यात रक्कम वळविण्यात आली होती. यात राणा कपूर यांची पत्नी बिंदू यांच्या बँक खात्याचाही समावेश आहे. यामध्ये ईडीला मनी लॉड्रिंगची शंका असल्याने ही छापेमारी करण्यात आली आहे.
Last Updated : Mar 7, 2020, 1:19 PM IST