मुंबई - शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत (Pravin Raut ED Custody) यांना काल बुधवार रोजी देणे अटक केली त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टाने प्रवीण राऊत यांना 9 फेब्रुवारीपर्यंत कोठडी दिली प्रवीण राऊत (ED Arrested Pravin Raut) यांचे ईडीकडून चौकशी केली. त्यानंतर आता याच प्रकरणात ईडीने राऊतांच्या दोन्ही मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावर आज धाड (ED raids Sujit Patkar's house) टाकली आहे. त्यांच्या घरी ईडीची शोध मोहिम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राऊत कुटुंबे ईडीच्या रडारवर असल्याची आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
त्यामुळे ईडीने सुजित पाटकरांच्या घरावर छापा (Raid on Sujit Patkar's house) टाकला. पाटकर जे मॅग्पी डीएफएस प्रा.लि .कंपनी मध्ये भागीदार आहेत. तसेच संजय राऊत यांची कन्या पूर्वाशी आणि विधीता यांची मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या वाईन वितरण कंपनीमध्ये भागीदारी आहे. ईडीने पाटकर यांच्या मुंबईतील घरी छापा टाकून चौकशी केली. पाटकर हे प्रवीण राऊत यांच्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शनशी संबंधित आहेत. 1034 कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊताच्या कन्या ईडीच्या रडारवर आहे.
सुजित पाटकर हा प्रवीण राऊतचा सहकारी असून प्रवीण राऊत आणि पाटकर यांच्यात काही व्यवहार झाल्याचा संशय आहे. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने संयुक्तपणे अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. तसेच आता पाटकरांच्या घरावर ईडीने झडती सुद्धा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीकडून अलीबाग येथील जमिन व्यवहाराचीही चौकशी केली जात असल्याचे समजते. पत्राचाळ प्रकल्पात मिळालेल्या पैशातून ही जमीन खरेदी केली आहे किंवा नाही याचा तपास केला जात आहे. या जमीन राऊतांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. प्रवीण राऊत हे HDIL सहाय्यक कंपनी असलेल्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे (Guruashish Construction Company) संचालक आहेत. गोरेगाव येथील जमीन विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली राऊत यांच्यावर ईडीकडून मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी सुरू होती.
प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटवरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता याचं उत्तर ईडीला हवं आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं होतं.
कोण आहेत प्रवीण राऊत?
प्रवीण राऊत संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपले, असा आरोप ईडीने केला. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होते. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊत यांचे एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची ईडीला खात्री आहे.