मुंबई : ईडीने मुंबईत 16हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीचे धाडसत्र 17 तास सुरू राहिले. ईडीने बीएमसीतील वैद्यकीय अधिकारी हरीश राडो, बीएमसीचे उपायुक्त रमाकांत बिरादार उपायुक्त यांच्या घरी धाड टाकली. तर उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय सुरेश चव्हाण याची रात्री दीड वाजेपर्यंत ईडीने चौकशी केली आहे. ईडीच्या चौकशीने दबाव वाढत असताना चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर गर्दी केली.
ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. ईडीने आज दहाहून अधिक ठिकाणी छापे मारले आहेत. कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा भाजपने आरोप केला होता. हे छापे संबंधित काम करणाऱ्या सुजित पाटकरांच्या मालमत्तावर टाकण्यात आले आहेत. ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण व आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत.
कोव्हिट सेंटरमध्ये घोटाळा : मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर रुग्णालयातील खाटांची संख्या कमी पडत होती. अशावेळी मुंबई महापालिकेकडून कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेने गोरेगाव, दहिसर, कांजूरमार्ग आणि मुलुंड येथे जम्बो कोव्हिड सेंटर सुरू केल्याने कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला होता. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी कोव्हिट सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचे सातत्याने आरोप केले आहेत. आज छापेमारी झाल्यानंतर सोमैय्या यांनी ट्विट करत हिशोब द्यावाच लागणार असे म्हटले आहे.
ईडीची छापेमारी सुरू :कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीची संपूर्ण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या देखील घरावर ईडीने छापेमारी केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या देखील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. वांद्रे पूर्व येथे असलेल्या रुस्तमजी ओरियन या इमारतीतील संजीव जयस्वाल यांच्या घरावर सध्या ईडीची छापेमारी सुरू आहे.
सतत १७ तास कारवाई सुरू :सुजित पाटकर यांच्या सांताक्रुज पूर्व येथील कलिना परिसरात असलेल्या सुमित आर्टिस्टा या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेला फ्लॅटवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे सुजित पाटकर यांच्या मालाड येथील गाळ्यावरदेखील ईडीने छापा टाकला आहे. मुंबई मालाड लिंकवे इंडस्ट्रीयल इस्टेट गाळा क्रमांक ३१६ वर सकाळी ७.०० वाजता ईडीचा छापा टाकण्यात आला आहे. त्यात ईडीची ४ कार्यालयांतील अधिकारी हजर आहेत. गाळा क्रमांक ३१६ ही पहल फार्मा मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. ही कंपनी सुजित पाटकर यांच्या नावाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंपनीत चार अधिकारी हजर होते.
राजकीय वर्तुळात खळबळ :ईडी शहरातील 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकत आहे.हे छापे बीएमसी कोविड घोटाळ्याशी संबंधित आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांचा व इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणीही छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची यापूर्वी या प्रकरणाशी संबंधित ईडीने चौकशी केली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीच्या घर आणि कार्यालयावर ईडीने सकाळी सकाळीच छापेमारी केली आहे. एकूण 15 ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही छापेमारी सुरू केली आहे.