मुंबई- तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबिर सिंग यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. यासंदर्भात ईडी कडून तपास केला जात आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे.
'या' आरोपांच्या पुराव्यांसाठी देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे... - वसूली
ईडीने बार मालकांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी चार कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला. याच आरोपांच्या चौकशीसाठी आणि पुरावे गोळा करण्याच्या हेतूने देशमुखांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची माहिती आहे.
बारमालकांचा आरोप -
याअगोदर ईडीकडून मुंबईतील काही बार मालकांची चौकशी करण्यात आलेली होती. मुंबई पोलीस खात्यातील गुन्हे शाखेचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे ला मुंबईतील 1 हजार 700 हून अधिक बार मालकांकडून 100 कोटी रुपये प्रति महिना वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर ईडीच्या चौकशीमध्ये मुंबईतील जवळपास 10 बार मालकांना बोलावण्यात आले. या बार मालकांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी चार कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला. याच आरोपांच्या चौकशीसाठी आणि पुरावे गोळा करण्याच्या हेतूने देशमुखांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची माहिती आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच ईडी आणि तपास यंत्रणांना सहकार्य करित असल्याचे म्हणाले.