महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ED raid Hasan Mushrif : कागल बंद करण्याऐवजी, ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य करा; हसन मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन - ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य करा

हसन मुश्रीफ यांनी कागल बंद न करण्याचे आवाहन केले आहे. हसन मुश्रीफांच्या घरी आणि नातेवाईकांच्या घरी ईडीने छापेमारी ( ED raid Hasan Mushrif house ) केली. त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून कागलबंदीची हाक देण्यात आली ( NCP Call For Kagal Band ) होती. त्यावर हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना ही विनंती केला ( Hasan Mushrif Appeal Not To Kagal Band ) आहे.

Hasan Mushrif
Etv Bharat

By

Published : Jan 11, 2023, 3:41 PM IST

मुंबई : आज सकाळपासूनच आपल्या घरी, नातेवाईकांच्या घरी आणि आपल्या मुलीच्या घरावर ईडी ( ED raid Hasan Mushrif house ) आणि आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या ( ED raid Hasan Mushrif relatives ) आहेत. काही कामानिमित्त आपण बाहेर आहोत. प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच आपल्याला ही बातमी समजले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आपल्यावर ईडी आणि आयटी विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईनंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कारवाईच्या विरोधात त्यांनी कागलबंदीची हाक दिली ( NCP Call For Kagal Band ) आहे. मात्र आपण सर्व कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत आहोत. असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले ( Hasan Mushrif Appeal Not To Kagal Band ) आहे.

कागलमध्ये बंद ठेवू नये :कागलमध्ये कोणताही बंद ठेवण्यात येऊ नये. याउलट आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे. एक व्हिडिओ समाजमाध्यामांवर प्रसिध्द करत त्यांनी हे आवाहन केले. दीड वर्षा आधीही याच प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या घरी धाड टाकली होती. त्यावेळेस सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी जमा केली होती. मात्र त्यानंतरही आता पुन्हा एकदा या धाडी का टाकण्यात येत आहेत? याची आपल्याला कल्पना नाही. असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले ( NCP aggressive ED raid in Kolhapur ) आहे.


विशिष्ट धर्माच्या नेत्यांवर कारवाई? : कोल्हापूर मधल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने दिल्लीत चकरा मारून आपल्यावर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता. चार दिवसापूर्वी कोल्हापूरमधील भारतीय जनता पक्षाचे नेते हे सार्वजनिक ठिकाणी हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी अधिकाऱ्यांची कारवाई होईल असे देखील सांगत होते. आपल्याला बदणाम करण्याचे राजकारण सुरू आहे. राजकीय आकसापोटी या कारवाया सुरू आहेत. आणि राजकीय अकसापोटी जर अशा कारवाया होत असतील तर त्याचा निषेध झाला पाहिजे असेही मत हसन यांनी व्यक्त केले आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यानंतर आता माझ्यावर केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाडी पडत आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे असलम शेख यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांची पुढील कारवाई होईल असे सांगत आहेत. त्यामुळे विशिष्ट धर्माच्या नेत्यांवर ही कारवाई केली जाते का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.



भाजपकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न :राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमधील कागल आणि पुणे येथील निवास्थानी आयटी आणि ईडी अधिकाऱ्यांनी आज सकाळी धाडी टाकल्या. हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाईची मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केलाय. हसन मुश्रीफ यांना भारतीय जनता पक्ष अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप करत आहे. भारतीय जनता पक्षाकडून हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. हसन मुश्रीफ यांना अडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी घेऊन कट कारस्थान केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details