मुंबई -अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची वकोला येथील अॅक्सिस बँकेच्या सांताक्रूझ शाखेत तब्बल चौकशी करण्यात आली. तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.
रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्तींची ईडीकडून सहा तास चौकशी - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी व सुशांतसिंहचा सीए संदीप श्रीधर, श्रुती मोदी यांच्या सह रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती हे गुरुवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित हजर झाले होते.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी व सुशांतसिंहचा सीए संदीप श्रीधर, श्रुती मोदी यांच्या सह रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती हे गुरुवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित हजर झाले होते. त्याठिकाणी त्यांची सहा तास चौकशी करून त्यांना घरी पाठविण्यात आले.
सुशांतसिंहने रिया व तिचा भाऊ शोविक याच्यासह मिळून 2 कंपन्यांची स्थापना केली होती. ज्यात रिया, सुशांत, व शोविक हे एका कंपनीवर संचालक होते. ज्याचा नोंदणीकृत पत्ता हा इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नवी मुंबईतील उलवे येथील फ्लॅटचा आहे. याच संदर्भात ईडीने इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे.