मुंबई -ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अखिल यांची मालमत्ता जप्त केली आहे. डिनो मोरिया काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे जावई आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये अहमद पटेल यांची प्रमुख भूमिका होती. मागच्या वर्षीच अहमद पटेल यांचे निधन झाले आहे.
डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांच्या संपत्तीवर ईडीची टाच - डीजे अखिल
ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अखिल यांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई स्टर्लिंग बायोटेक बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आलेली आहे. ईडीला चौकशी दरम्यान या तिघांचे संबंध गुजरातचे बिझनेस मॅन संदेसरा बंधू यांच्याशी आढळले. संदेसरा बंधू हे 14,500 कोटी लोन घोटाळ्यातील आरोपी आहे.
ही कारवाई स्टर्लिंग बायोटेक बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आलेली आहे. ईडीला चौकशी दरम्यान या तिघांचे संबंध गुजरातचे बिझनेस मॅन संदेसरा बंधू यांच्याशी आढळले. संदेसरा बंधू हे 14,500 कोटी लोन घोटाळ्यातील आरोपी आहे.
किती संपत्ती झाली जप्त
ईडीने अभिनेता डिनो मोरिया याची 1.40 कोटी, संजय खान यांची 3 कोटी, डीजे अकील यांची 1.98 कोटी संपत्ती जप्त केली आहे.
हेही वाचा -गेल्या चार वर्षात ईडी झोपली होती का? साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल